Share

मेट्रोचा श्रेयवाद पेटला! फडणवीस म्हणतात, प्रश्न श्रेयाचा नाही, तर…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन, शाळा सुरु करण्यासंबंधी भूमिका, येणारे सण-समारंभ, विकासकामे, मेट्रो कारशेड अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं.

मेट्रो कारशेडच्या जागेचा वाद सद्या पेटला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या टीकांना ठाकरेंनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आरेमध्ये फक्त मुंबई मेट्रोच्या एका लाइनचं काम होणार होतं, पण कांजूरमध्ये मेट्रोच्या ३ लाइनचं काम होऊ शकतं. त्यामुळे केवळ एका लाइनसाठी मेट्रोचं कारशेड आरेमध्ये कशाला? आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे.’ असं ते म्हणाले.

आता माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या संवादाला लक्ष्य केलं आहे. ‘प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? असा सवालच त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

तर, ’30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा! कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता?’ अशी विखारी टीका फडणवीसांनी केली आहे.

‘बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे. ते काम जवळजवळ 80%पूर्ण होत आहे.आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार! मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे,त्यांना आणखी त्रास नको.हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका,ही हात जोडून विनंती आहे!’ असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!