Share

शुद्ध पाण्यासाठी रोशन गेट भागातील नागरिकांची अखेर मनपा आयुक्तांकडे धाव

Published On: 

औरंगाबाद : वॉर्ड क्रमांक ५३ रोशन गेट येथील बारी कॉलनीत गत दिड वर्षांपासून दूषित पाण्याची समस्या आहे. हे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच मात्र वापरायोग्य देखील नाही. या दूषित पाण्याला येणाऱ्या दुर्गंधीमुळे हे पाणी साठवले जाऊ शकत नाही. तसेच यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेने दहा दिवसात येथील पाणी समस्या लवकरात लवकर सोडवावी अन्यथा भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त आस्किककुमार पांडेय यांना नागरीकांच्या वतीने देण्यात आला.

बारी कॉलनीत गेल्या दीड वर्षांत असून दूषित पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पोटाचे विकार होत आहेत. त्याचप्रमाणे दूषित पाण्याबरोबरच अनियमित होणारा पाणीपुरवठा हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. या ठिकाणी दहा ते अकरा दिवसांआड पाणी येते. त्यामुळे या भागातील नागरिकांना दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. येथील नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहता पाणी विकत घेऊन गुजराण करणे त्यांना शक्य नाही. या पार्श्वभूमीवर रोशन गेट परिसरातील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी भारत मुक्ती मोर्चा द्वारे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांना निवेदन देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!