Share

औरंगाबादेत काँग्रेसची वैद्यकीय कमिटीद्वारे कोरोना रुग्णांना मदत!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कुठे रुग्णांना बेड मिळत नाही तर कुठे ऑक्सिजनची सुविधादेखील नाही. सद्यस्थितीत शहरात एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात काँग्रेसने डॉक्टरांची टिम तयार करण्यात आली आहे. याद्वारे रुग्णांना थेट मदत केली जाणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा व शहर स्तरावर कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय मदत तसेच विविध प्रकारच्या मदत करण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. नाना पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हीशाम उस्मानी यांनी सुद्धा पक्षाच्या वतीने कमिटी बनवून त्यात विविध प्रतिष्ठित डॉक्टरांना निमंत्रित करून तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त कमिटी स्थापन केली आहे.

यात गोरगरीब सामान्य जनतेसाठी कोविड रुग्णांना मदत देण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आली आहे. यात मोबाईल क्रमांक सुद्धा देण्यात आले असून रुग्ण मदतीसाठी २४ तास संपर्क करु शकतात. युवक काँग्रेसचे निलेश अंबेवाडीकर यांना फोन आला की एम.जी.एम हॉस्पिटल येथे रेमडिसीवीरची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून त्यांच्या मान्यतेने घाटीमधून २५० रेमडिसीवीर रुग्णांना देण्यात आले. या अत्यंत महत्त्वाच्या मदतीसाठी युवक काँग्रेसचे मराठवाडा प्रवक्ता निलेश आंबेवाडीकर, मोहसीन खान यांनी परिश्रम घेऊन रुग्णाला त्वरित इंजेक्शन मिळवून दिले. तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना देखील इंजेक्शन मिळवून देण्यासाठी मदत करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!