औरंंगाबाद : कौटुंबिक कलहातून एमआयडीसी वाळूज परिसरातील घाणेगाव येथे राहणा-या अलका संतोष बनसोडे (वय ३५) या महिलेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.३०) दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास घाणेगावात असलेल्या पाझर तलावाजवळ घडली.
महिलेने विहिरीत उडी घेतली असल्याची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे कर्मचारी अब्दुल अजीज, एल.पी.कोल्हे, विनायक लिमकर, संग्राम मोरे, अक्षय नागरे, समीर शेख, पंकज भालेकर, सुभाष दुधे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
विहिरीतून अलका बनसोडे यांचा मृतदेह बाहेर काढुन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात दाखल केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

