Share

कोरोनानंतर मेल्ट्रॉन रुग्णालय सर्वसामान्यांसाठी होणार खुले, हेल्थ कार्डबाबत पालिकेचा विचार सुरु!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने एमआयडीसीमार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून मेल्ट्रॉन कंपनीत हॉस्पिटल सुरू करून ते महापालिकेला वर्ग केले आहे. कोरोना संसर्ग संपल्यानंतर या हॉस्पिटलचा वापर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना व्हावा यासाठी आरोग्य कार्ड (हेल्थ कार्ड) देण्याचा महापालिकेचा विचार असून, अंतिम निर्णय सर्वसाधारण सभा अस्तित्वात आल्यानंतर होईल, असे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांना तातडीने उपचार मिळावे यासाठी राज्य शासनाने सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून गतवर्षी मेल्ट्रॉन येथे हॉस्पिटल उभारले. हे हॉस्पिटल महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर तीनशे रुग्णांचे कोविड केअर सेंटर याठिकाणी सुरू आहे. त्यानंतर ५० रुग्णांची क्षमता वाढविण्यात आली. दरम्यान कोरोना संसर्ग संपल्यानंतर याठिकाणी संसर्गजन्य आजारासाठी मराठवाड्यातील एकमेव रुग्णालय सुरू करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता.

त्यानुसार शासनासोबत पत्र व्यवहार करण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली होती. दरम्यान यासंदर्भात विचारणा केली असता श्री. पांडेय यांनी सांगितले की, कोविड केअर सेंटरसाठी सिटीस्कॅन मशिन देण्यात आले आहे. तसेच रक्तासंबंधी चाचण्या करण्यासाठी याठिकाणी लॅब आहे. त्याचा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना फायदा व्हावा म्हणून ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर नागरिकांना आरोग्य कार्ड देण्याचा महापालिकेचा विचार आहे. हे कार्ड एका वर्षासाठी असेल.

एसपीव्ही स्थापन करणार
मेल्ट्रॉन हॉस्पिटलसाठी स्वतंत्र एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल) स्थापन केली जाईल. जेणे करून इतर हस्तक्षेप कमी होतील. नागरिकांसाठी नाममात्र दरात याठिकाणी चाचण्या केल्या जातील. यासंदर्भातील अंतिम निर्णय सर्वसाधारण सभा अस्तित्वात आल्यानंतर होऊ शकतो, असे पांडेय यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!