नवी दिल्ली : टी-२० वर्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारतास पराभूत केल्याने क्रीकेट प्रेमी प्रचंड नाराज आहेत. मात्र दुसरीकडे पाकिस्तानच्या विजयाचे वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. जम्मू काश्मीरच्या काही भागात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर हरयाणा सरकारमधील भाजपाचे गृह मंत्री अनिल वीज यांनी टीका केली आहे. मेहबुबा मुफ्ती यांचा डीएनए सदोष आहे. त्या कितपत भारतीय आहेत, हे त्यांनी सिद्ध करावे. असे अनिल वीज म्हणाले.
मेहबुबा मुफ्ती ट्विट मध्ये म्हणाल्या ‘पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींवर एवढा राग कशासाठी? देश के गद्दार को, गोली मारो… अशा प्रकारच्या घोषणाही काही लोक देत आहेत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर कितीतरी लोकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला होता, हे कोणीही विसरू शकणार नाही. विराट कोहलीप्रमाणे याकडे योग्य भावनेने पाहा. विराट कोहलीने सर्वप्रथम पाकिस्तानी संघाचे अभिनंदन केले आहे,’ असे मेहबुबा मुफ्ती ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. मेहबुबा मुफ्तींनी या ट्विटमध्ये विराट कोहलीचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात तो पाकिस्तानी फलंदाज रिझवानशी बोलताना दिसत आहे.
दुबईमध्ये रविवारी भारत -पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी २० विश्वचषक सामन्यात भारताच्या क्रिकेट संघाचा पराभव झाला आहे. २००७ ते २०१६ या दरम्यान भारत पाकिस्तानकडून कधीही हरलेला नाही. मात्र, आता भारत पराभूत झाल्याचे पहायला मिळाले. भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानात हवेत गोळीबार केल्याच्या बातम्या येत आहेत. कराचीमध्येच एका उपनिरीक्षकासह अनेक ठिकाणी गोळीबारात १२ जणांना गोळ्या लागल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी देणार- नवाब मलिक
- जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 अन्वये अधिकार प्रदान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

