Share

‘मी बाप बदलणाऱ्याच्या बापाला पण भीत नाही’, मेहबूब शेख यांचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार

Published On: 

मुंबई : सध्या राज्यात विविध कारणांनी राजकीय वातावरण गरम झालेले आहे. एक प्रकरण शमते न शमते तोच दुसरा मुद्दा जोर धरू लागतोय. नारायण राणे अटक प्रकरणामुळे तर पूर्ण देश ढवळून निघाला. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये घमासाण शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यातच ईडीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीचे नेते भाजपावर हल्लाबोल करत आहेत. या सर्वांमध्ये पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे काही गंभीर आरोप केले. हा मुद्दा देखील चांगलाच चर्चिला जात आहे.

ज्योती देवरे यांची बाजू घेत भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आमदार लंके यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर कडाडून टीका केलीय. ‘चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो’, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.

यावर आज सकाळी प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ यांनी थेट मेहबूब शेख यांनाच इशारा दिला. ‘मी काय आहे, काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा. कोल्ह्या-कुत्र्यांना घाबरणारी नाही’ अशी जहरी टीका वाघ यांनी केली. त्यानंतर चित्रा वाघ यांच्या या टीकेला मेहबूब शेख यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ‘आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही’ या शब्दांत आक्रमक टीका मेहबूब यांनी केली आहे.

https://www.facebook.com/mahebubshaikh99/posts/4357539577665965

फेसबूकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, ‘आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही, डायलॅाग बाजी सोडा आणि आपल्या नवऱ्यावर ५ जुन २०१६ ला कार्यवाही झाली तेव्हा सरकार कुणाच होत ते सांगा? त्यांनी कोणत्या बुध्दीने कार्यवाही केली होती याच उत्तर द्या. आणि तुम्ही काय आहात हे आम्ही पाहिले आहे, कुणाला विचारायची आवश्यकता नाही. जस आम्ही म्हणतो की आमची नार्को करा तस म्हणा नवऱ्याची पण नार्को करा. कर नाही त्याला डर कशाला. भुंकतय कोण हे महाराष्ट्र बघतोय. आणि मी पण बाप बदलणाऱ्याच्या बापाला पण भीत नाही’ असा हल्लाबोल मेहबूब यांनी केला आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?

वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकताहेत. कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले.आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू आह्ये. पण मी काय आहे; काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. असा दम भरवत मी वाघ आहे लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही. असा इशारा त्यांनी ट्वीट करत दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!