Share

औरंगाबाद पालिकेत होणार मेगा नोकरभरती, नगरविकासमंत्र्याची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आकृतिबंधाच्या मंजुरीबाबत  सोमवारी (दि. १५) शासन निर्णय निघणार आहे. अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. शनिवारी ( दि.१३) महानगरपालिका मुख्यालय येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृहात एकत्रित विकास नियमावली (युनिफाईड डिसीआर ) अंमलबजावणी व विकास कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मनपाच्या आकृतिबंधाविषयी विषयी शिंदे म्हणाले की, ‘येत्या सोमवारी शासन निर्णय निघणार आहे. यामुळे महानगरपालिकेतील रिक्त जागा भरणे व पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा होईल’. महापालिका प्रशासनाने तयार केलेला आकृतीबंध राज्य शासनाच्या नगरविकास विभागात अडकला होता. वारंवार पाठपुरावा करुनदेखील आकृतीबंधाला मंजुरी मिळालेली नव्हती.

रिक्त पदांमुळे महापालिका संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आणि अखेर ही घोषणा झाली. पालिकेत वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असताना कारभार कसा चालवायचा असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला होता.

यामुळे महापालिकेला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९९२ मध्ये पालिकेत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करण्यात आली. त्यानंतर मात्र नोकर भरतीला ब्रेक लागला. दरम्यानच्या काळात अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे रिक्त पदांची संख्याही वाढली आहे.

पालिकेच्या प्रशासनाने २०१६ – १७ या वर्षी आकृतीबंध तयार केला आणि तो शासनाला पाठवला. सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता प्रशासनाने मंजुरीसाठी शासनाकडे परस्पर आकृतीबंध पाठवला. शासनाने तो आकृतीबंध फेटाळला आणि सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन आकृतीबंध सादर करा असे आदेश पालिका प्रशासनाला दिले.

शासनाने फेटाळलेला आकृतीबंध सर्वसाधरण सभेच्या समोर न ठेवता प्रशासनाने नवा आकृतीबंध तयार करुन तो सर्वसाधारण सभेसमोर ठेवला. सर्वसाधारण सभेने नवा आकृतीबंध न स्वीकारता जुन्याच आकृतीबंधात काही सुधारणा सुचवून सुधारणांसह आकृतीबंध शासनाच्या मंजुरीला पाठवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. आज अखेर नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!