Share

‘त्या’ मंत्र्याला लाथ मारून हाकलून द्या, तुमचा ‘ठाकरी बाणा’ दाखवा, महिला डॉक्टरचे पत्र

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संबधित मंत्र्याला त्याच्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरी बाणा दाखवून त्या मंत्र्याची लाथू मारून खुर्ची खाली करून घ्यावी असे आवाहन भाजप पदाधिकारी डॉ. पुनम राऊत यांनी केले आहे. केलेल्या विनंतीची दखल घ्यावी म्हणून राऊत यांनी पत्रासोबत मुख्यमंत्र्यांनी राखीही पाठविली आहे.

डॉ.पुनम राऊत या भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड येथील ओबीसी मोर्चा प्रदेश युवती आघाडीच्या संपर्क प्रमुख आहेत.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी जरी विरोधी पक्षाची कार्यकर्ती असली तरी पत्रामागे कोणताही राजकीय हेतू नाही. राज्यातील सर्व महिला आणि मुलींची प्रतिनिधी म्हणून पत्र लिहित आहे.

सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराप्रमाणे वागावे अशी अपेक्षा असते. परंतू आपलेच मंत्री संजय राठोड यांच्यामुळे एका भटक्या समाजातील मुलीला आत्महत्या करावी लागली. याचा खेद आहे. या प्रकरणात पूजा चव्हाण हिला न्याय मिळायला हवा. अन्यथा, यासारख्या घटनांमुळे समाजकारण, राजकारण करू इच्छिणाऱ्या महिला-मुलींना आत्मविश्वास राहणार नाही.

त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संबधित मंत्र्याला त्याच्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरी बाणा दाखवून त्या मंत्र्याची लाथू मारून खुर्ची खाली करून घ्यावी. मुलींच्या मनात असलेला संशय, भीती आणि अन्याय दूर व्हावा याकरिता पुनम राऊत यांनी पत्रासोबत मुख्यमंत्री ठाकरे यांना राखीही पाठविली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!