Share

राज्यातील नेत्यांच्या दिल्लीत भेटीगाठी वाढल्या; आता राणा दाम्पत्याने घेतली अमित शाह यांची भेट

Published On: 

नवी दिल्ली : मागील काही आठवड्यांपासून राज्यातील नेत्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी आणि केंद्रीय मंत्र्यांशी भेटीगाठी वाढल्याचं दिसून येत आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत विविध नेते हे दिल्लीत भेटीगाठी घेत आहेत. अशातच आता राणा दाम्पत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमित शाह यांची आज भेट घेतली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून नवनीत राणा व रवी राणा हे दोघेही राज्य सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर रवी राणा यांनी भेटीची माहिती देत कारण देखील ट्विटरद्वारे स्पष्ट केलं आहे.

‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन केली महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा, महाराष्ट्रात आलेला महापूर, अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले व केंद्राने महाराष्ट्रातील पुरपीडितांना भरीव मदत दयावी अशी मागणी केली. महाराष्ट्राच्या या संकटसमयी अमित शाह यांनी तातडीने केंद्रातर्फे एन.डी.आर.एफ. चे बचाव पथक पाठविले ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचविले व केंद्राने तात्काळ 700 कोटींची मदत राज्याला दिली याबद्दल अमितजी शाह यांचे आभार मानले,’ असं ट्विट रवी राणा यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!