नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील भाजप नेते हे राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या भेटीमागे प्रदेशाध्यक्ष बदलाचे कारण असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे कालच दिल्लीत दाखल झाले असून ते देखील विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत. यासोबतच उद्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची बैठक पार पडणार आहे. यावेळी चंद्रकांत पाटील हे देखील हजर असतील.
तर, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर नेते देखील राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेत असून चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार असे तर्क लावले जात आहेत. दरम्यान, आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनी या चर्चांवर भाष्य केलं आहे.
‘भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो,’ असं चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ही प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ख्वाहिश आपको सोने ना दे’ ; नीरज चोप्रानं ४ वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट होतयं व्हायरल
- ‘राहुल गांधी हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो’; राणेंची खोचक टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- ‘महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, १६ ऑगस्टनंतर…,’ नारायण राणेंचा इशारा
- पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात, विजयासाठी भारताला हव्या १५७ धावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
