🕒 1 min read
नवी दिल्ली : राज्यात महाविकास आघडीचे सरकार आल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेसह सरकारवर सातत्याने हल्लाबोल करताना दिसत आहेत. तर नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर शिवसेनेकडून देखील टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज राणेंची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे हे देखील हजर होते. दरम्यान, या भेटीनंतर चंद्रकांत पाटील आणि नारायण राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद धुमसत असल्याचं अनेकदा समोर आल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची चांगलीच जवळीक वाढल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधी हे संजय राऊत यांच्यासोबत खांद्यावर हात टाकून चर्चा करत असल्याचा फोटो देखील समोर आला आहे.
याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, कशाला सकाळी-सकाळी त्यांचं नाव घेऊन दिवस खराब करताय, अशी खोचक प्रतिक्रिया दिली. यासोबतच, ‘राहुल गांधी ज्या पक्षावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो.’ असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याच्या शक्यता असून यासाठी राज्यातील नेत्यांच्या राष्ट्रीय नेत्यांची भेटीगाठी वाढल्याच्या चर्चा आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्यासह नारायण राणे यांनी या चर्चा धुडकावून लावत केवळ नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांना सदिच्छा देण्यासाठी हा दिल्ली दौरा असल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ख्वाहिश आपको सोने ना दे’ ; नीरज चोप्रानं ४ वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट होतयं व्हायरल
- ‘राहुल गांधी हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो’; राणेंची खोचक टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- ‘महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, १६ ऑगस्टनंतर…,’ नारायण राणेंचा इशारा
- भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा; दिल्लीत चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
