मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.
दरम्यान या पत्रावरुन अभिनेत्री कंगना रणौत हिनं पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. “मी म्हणाले होते हे सरकार भ्रष्टाचारी आहे अन् मी देशभक्त” असा टोला तिनं लगावला आहे. “येत्या काळात हे भ्रष्टाचारी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे एक्सपोज होईल. मी केलेला दावा अखेर सिद्ध झाला आहे. माझ्या शरीरात राजपुतांचं रक्त आहे. मी आणि माझं कुटुंब या भूमीवर प्रचंड प्रेम करतो. मी हरामखोर नाही खरी देशभक्त आहे.”
In coming days they will be fully exposed, today I stand vindicated, hence it is proven in my brave Rajputana blood flows the loyality and true love for the land that feeds me and my family. I am a true desh bhakt not haramkhor #MahaVasooliAghadi #AnilDeshmukh #ParambirSingh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 20, 2021
“जेव्हा मी महाराष्ट्र सरकारविरोधात आवाज उठवला तेव्हा मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. माझ्यावर टीका झाली. पण जेव्हा मी माझ्या शहरासाठी आवाज उठवला तेव्हा त्यांनी माझं घर तोडलं. तेव्हा अनेक लोकांनी आनंद साजरा केला होता. पण आता त्यांच्या खेळ दिर्घकाळ चालणार नाही.” अशा आशायाची दोन् ट्विट्स करुन कंगनानं राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली आहे. तिची ही ट्विट्स सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
In coming days they will be fully exposed, today I stand vindicated, hence it is proven in my brave Rajputana blood flows the loyality and true love for the land that feeds me and my family. I am a true desh bhakt not haramkhor #MahaVasooliAghadi #AnilDeshmukh #ParambirSingh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 20, 2021
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ : शरद पवार
- अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; शरद पवारांचं भाष्य !
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

