🕒 1 min read
मुंबई / औरंगाबाद : वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरामध्ये गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना आक्रमक झाली असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान पुन्हा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. महाराष्ट्रातील मोठा प्रकल्प केंद्राकडून नामंजूर करण्याच आला आले. बिडकीन येथील प्रस्तावित मेडिकल डिव्हाईस पार्क केंद्राकडून नामंजूर करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे सरकार आमने-सामने आले आहेत.
मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून हिरावून घेतला जात असल्याचा आरोप आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मेडिकल डिव्हाइस पार्क प्रकल्पाच्या मंजुरीबाबत पुरावे दाखवण्याचे आव्हान दिले होते.
रविवारी आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले की, “वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का?”
वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे.
उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे.
याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का? https://t.co/zrXmSUTdDK— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 25, 2022
मेडिकल डिव्हाइस पार्कला का मंजुरी मिळाली नाही?-
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, “केंद्र सरकारच्या बल्क ड्रग पार्क धोरणांतर्गत मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान देण्याची योजना आहे. त्याअंतर्गत औरंगाबादमध्ये मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्याची विनंती मी केंद्र सरकारकडे केली होती. मी राज्यसभेत विशेष उल्लेख प्रस्तावांतर्गत या प्रकल्पासाठी अनुदानाची विनंती केली होती. यानंतर आता केंद्र सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी अनुदान देण्यास नकार दिला आहे. केंद्रीय आरोग्य आणि रसायन मंत्री मनसुख मांडविया यांनी मला पाठवलेल्या पत्रात मला सांगण्यात आले आहे की 16 राज्यांनी या प्रकल्पाची मागणी केली होती. त्यानंतर हा प्रकल्प 4 राज्यांना मंजूर करण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही. मेडिकल डिव्हाइस पार्क प्रकल्पाला कोणत्या आधारावर मंजुरी मिळाली नाही हे केंद्र सरकारने सांगावे?”
मंजुरीबाबत मला एक तरी पत्र दाखवा- फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्पाच्या मंजुरीबाबत मला एक तरी पत्र दाखवा. ज्यावरून महाराष्ट्रात मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आल्याचे दिसून येईल. आदित्य ठाकरे हे बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्पाच्या मंजुरीबाबत पुरावा दाखवावा.”
इतर राज्यात गेलेला तिसरा मोठा प्रकल्प-
औरंगाबाद येथील ऑरिक सिटी येथे 424 कोटींचा वैद्यकीय उपकरणे पार्क प्रस्तावित होता. वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्कनंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेला हा तिसरा मोठा प्रकल्प आहे. राज्याकडून योग्य पद्धतीने प्रस्ताव सादर न केल्याने प्रकल्प नामंजूर करण्यात आला, अशी टीका शिंदे सरकारवर होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrkant Kaire | “याला अधिकारीच काय, तर कुत्रही विचारणार नाही”; खैरेंचा संदिपान भुमरेंवर हल्ला
- Medical Device Park | मोदी सरकारचा शिंदे गटाला झटका! ; महाराष्ट्रातील मोठा प्रकल्प केंद्राकडून नामंजूर
- Health Tips | आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे मध, जाणून घ्या!
- Narayan Rane | “दोन महिन्यात बांधकाम पाडा अन्यथा…”, सर्वोच्च न्यायालयाचा नारायण राणेंना दणका
- Yashomati Thakur | संतोष बांगर पैसे घेऊन शिंदे गटात गेले, लोकांचा रोष थांबवू शकत नाही – यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
