Share

Medical Device Park | मोदी सरकारचा शिंदे गटाला झटका! ; महाराष्ट्रातील मोठा प्रकल्प केंद्राकडून नामंजूर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरामध्ये गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना आक्रमक झाली असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. आदित्य ठाकरे जनआक्रोश मार्चाच्या माध्यमातून शिंदे सरकारवर प्रहार करत आहे. दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मोठा प्रकल्प केंद्राकडून नामंजूर करण्याच आला आले. बिडकीन येथील प्रस्तावित मेडिकल डिव्हाईस पार्क केंद्राकडून नामंजूर करण्यात आले. त्यामुळे शिंदे सरकारवर टीका होत आहे.

औरंगाबाद येथील ऑरिक सिटी येथे 424 कोटींचा वैद्यकीय उपकरणे पार्क प्रस्तावित होता. वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्कनंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेला हा तिसरा मोठा प्रकल्प आहे. राज्याकडून योग्य पद्धतीने प्रस्ताव सादर न केल्याने प्रकल्प नामंजूर करण्यात आला, अशी टीका शिंदे सरकारवर होत आहे.

राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला-

ऑरीक बिडकिनमध्ये वैद्यकीय उपकरणे पार्क उभारण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. ‘प्रमोशन ऑफ मेडिकल डिव्हायसेस पार्क’ योजनेअंतर्गत हा प्रस्ताव 2020 मध्ये केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल्स विभागाकडे पाठवण्यात आला होता.

रसायने आणि खते मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या योजनेकरीता एकूण 16 राज्यांनी प्रस्ताव पाठवला होता, यापैकी चार राज्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही निवडलेली राज्ये आहेत. दुर्दैवाने यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!