Share

मेधा कुलकर्णींनी पंतप्रधान मोदींना बांधली राखी; विधवा महिलांसाठी केली खास मागणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भाजपच्या माजी आमदार आणि भाजपच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींशी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान मोदींना राखी देखील बांधली. पंतप्रधान मोदींची ही भेट अलौकिक, अद्वितीय व्यक्तिमत्वाची आणि अविस्मरणीय असल्याची भावना मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवारवाड्याच्या जिर्णोद्धारासाठी निधी, आदी विषयांवर चर्चा केली असल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. तसेच, कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठीही मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे.

कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एकरकमी ५ लाख रुपये किंवा दरमहा ५ हजार रुपये वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी, अशी विनंती पंतप्रधानांकडे केली. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी अशा विषय देखील मी माननीय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले. मोदींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, असं ट्वीट मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!