औरंगाबाद : मराठवाड्यात पाणी कमी आहे, पण येथील लोंकाच्या हृदयात खूप पाणी असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारोहाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ घेण्यात आला. या वेळी अधिष्ठातांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम शरीरक्रियाशास्त्र विभागातर्फे घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, व्यासपीठावर उपअधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ. भारत सोनवणे, शरीररचनाशास्र विभागप्रमुख डॉ. प्रतिमा कुलकर्णी, जीव रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. रेषाकिरण शेंडे, शरीरक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सईदा अफरोज, डॉ. सुधीर चौधरी, कम्युनिटी मेडिसीनचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची उपस्थिती होती. व्यासपीठावरील मान्यवरांचे पर्यावरणपूरक स्वागत रोपटे देऊन केले. त्यानंतर डॉ. अश्फाक यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी मिळवण्याची जिद्द असणे आवश्यक आहे. डॉ. प्रतिभा देशमुख यांनी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांची ओळख करून दिली. अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता यांनी आजचा अभ्यास उद्यावर ढकलू नये, वैद्यकीय ज्ञान जोपसण्याबरोबर रुग्णाशी संवाद साधणे आवश्यक आहे. पालकांनीही नेहमी मुलांच्या अभ्यासाबाबत जागरुक रहावे, असे सांगितले.
त्यानंतर एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांना अधिष्ठाता, उपअधिष्ठाता यांच्या हस्ते ॲप्रन देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. आराधना देशमुख यांनी, तर आभार डॉ. प्रतिभा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- देशात अवघड मानल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत मुंबईच्या कोमल जैनचा पहिला क्रमांक !
- हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया !
- ‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही’
- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अर्थसंकल्प तयार करणे हे फार कठीण काम होते – शहा
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !

