🕒 1 min read
नवी दिल्ली : सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुलच्या (KL Rahul) जबरदस्त शतकावर मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मयंक अग्रवालने केएल राहुलचे कौतुक केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुलने जबरदस्त शतक झळकावले. तो अजूनही 248 चेंडूत 122 धावा करून नाबाद आहे.
केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 117 धावांची शानदार भागीदारी केली. मयंक अग्रवालनेही ६० धावांची अर्धशतकी खेळी केली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मयंक अग्रवालने केएल राहुलच्या शतकाबाबत वक्तव्य केले. तो म्हणाला, केएल राहुलला माहित आहे की त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे. तो बॉलच्या ओळीत चांगला येतो आणि बॉलला शानदारपणे सोडतो. तो त्याच्या गेम प्लॅन आणि मानसिकतेबद्दल खूप शिस्तबद्ध आहे. तो सत्रानुसार फलंदाजी करतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवशी भारताने चांगली कामगिरी केली आणि २७२/३ अशी धावसंख्या उभारली.
महत्वाच्या बातम्या
- द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील शतकानंतर केएल राहुलची प्रतिक्रिया
- महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ महाराजांविरोधात तक्रार दाखल
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
- नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन; पंतप्रधान मोदींची ट्वीट करत श्रद्धांजली
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन


