Share

द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील शतकानंतर केएल राहुलची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आशियाबाहेरच्या कसोटी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावणारा केएल  राहुल (KL Rahul) दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी 2014 मध्ये मुरली विजयने 2014 मध्ये ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. केएल राहुलने सुपरस्पोर्ट पार्कवर १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२२ धावांची नाबाद खेळी खेळली.

दमदार खेळीनंतर बीसीसीआयशी बोलताना राहुल म्हणाला, “हा खरोखरच खूप खास अनुभव आहे. प्रत्येक शतक तुमच्याकडून खूप संयम आणि मेहनतीची मागणी करतं पण शतक पूर्ण झाल्यावर तुम्हाला खूप आनंदही मिळतो.

जेव्हा तुम्ही शतक झळकावता तेव्हा तुमच्या आत खूप भावना निर्माण होतात. तुम्ही ६-७ तास फलंदाजी करता, अशा प्रकारच्या खेळी वेगळ्या असतात आणि खेळाडू म्हणून आम्ही त्यांचे मनापासून कौतुक करतो. माझ्याकडून तेच अपेक्षित आहे. एकदा मी चांगली सुरुवात केल्यानंतर, मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेऊ लागलो आणि मी फार पुढे पाहिले नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!