Share

पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, १०० पेक्षा जास्त गुन्हे; अखेर ‘त्या’ टग्याला अटक

Published On: 

मुंबई : शंभर पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या हैदर तहजीब इराणी या सराईत गुन्हेगारास खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांवरील हल्ल्याचा हैदर मास्टर माईंड होता. इतक्या मोठा गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्याने त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे. हैदर याला चोरट्यांच्या टोळीत चोरट्यांचा नेता असे संबोधिले जायचे. त्याच्या टोळीतल्या एखाद्या गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या की तो आकाडतांडव करायचा. थेट पोलिसांवर हल्ला घडवून आणायचा. पण या चोरट्यांच्या नेत्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे.

राज्यभरात अनलॉक सुरु झाल्यावर रस्त्यावर आणि प्रवासात गर्दी दिसून येत आहे. लोक घराबाहेर पडू लागल्याने चोरही सक्रीय झाले आहे. मोबाईल आणि चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत आहेत. ठाण्यात मोबाईल चोरटय़ाशी दोन हात करताना दोन जणांना जीव गमाविण्याची वेळ आली. काही दिवसापूर्वी रेल्वेतून प्रवासी करणाऱ्या एका मॉडेलचा चोरटय़ाने मोबाईल हिसकावून पळ काढला. तसेच शनिवारी आंबिवली कल्याण रेल्वे स्थानकात चोरटय़ाने प्रवाशावर हल्ला करुन मोबाईल हिसकावून पळ काढला.

या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. खडकपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी योगेश गायकर यांनी आंबिवली नजीकच्या इराणी वस्तीत छापा टाकून हैदर तहजीब इराणी याला अटक केली आहे. त्याविरोधात कल्याण डोंबिवलीत २५, मुंबईत ३०, राज्यभरात आणि राज्याच्या बाहेर परराज्यात मिळून जवळपास १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी आज मोठी कामगिरी केली आहे.

पोलिसांनी आंबिवलीतील इराणी वस्तीत छापा टाकून तिथला दादा हैदर तहजीब इराणी याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपी हैदरवर जवळपास 100 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत. इतकंच नव्हे तर पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा तो मास्टमाईंड होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!