नाशिक : कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येऊन ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या कामाला गती देण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट आणण्यासाठी बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. भुजबळ फार्म येथे जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, रुग्णसंख्या कमी होण्याची परिस्थिती दिलासादायक असली तरी ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर कडक निर्बंध लावण्याबाबत नियोजन करण्यात येवून प्रतिबंधात्मक क्षेत्र वाढविण्यात यावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यात बेड, ऑक्सिजन आणि रेमडिसिव्हीरचा पुरवठा सुरळीत असून रेमडिसिव्हीचा गरजेपेक्षा अधिक वापर टाळण्यात यावा. ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयात आवश्यक ते मुनष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेत कुणी वंचित राहणार नाही यासाठी लसीकरणाबाबत योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- यांच काही वेगळच चाललंय, निवृत्ती स्विकारण्याच्या वयात कसोटी पदार्पण; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
- अभिनेत्री कंगनाला कोरोनाची लागण ; सोशल मिडियावरून स्वतः दिली माहिती
- मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करत आलिया भट्टने मेन्टल हेल्थ सेंटरची दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

