🕒 1 min read
औरंगाबाद: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील एका विवाहितेने कौटुंबिक वादातून पोटच्या चार लेकरासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून संपुर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी (३२), भक्ती (१३), ईश्वरी(११), अक्षरा(९) व मुलगा युवराज (७) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव गावातील ज्ञानेश्वर प्रल्हाद अडाणी हे पत्नी गंगासागर अडाणी व तीन मुली आणि एक मुलासह गावात राहतात. गुरुवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गंगासागर या तीन मुली व मुलासह शेतात चक्कर मारायला गेल्याचे अनेकांनी पाहिले. गंगासागर यांनी मुलामुलीसह सायंकाळी साडेपाच शेतातच वेळ घालवला. सात वाजेपर्यंतही गंगासागर व मुलेमुली घरी न परतल्याने ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध केली. परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला मात्र त्या आढळून आल्या नाही.
सकाळीच काही जणांना अडाणी यांच्या शेताशेजारच्या गणेश फिसके यांच्या गट नं ९३ मधील विहिरीत या पाचही जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आले. गंगासागर अडाणी हिने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे आढळून आले. दरम्यान या घटनेची माहिती गोदी पोलीस ठाण्यात दिल्याने घटनास्थळी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ सह कर्मचारी हजर होऊन या पाचही जणांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गोदी पोलिसांनी ज्ञानेश्वर अडाणी यांना ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेची पोस्ट
- सिंधुदुसिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील
- सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- कंगनाने केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे आणखी एक तक्रार दाखल
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने चारली ‘मविआ’ला धूळ


