औरंगाबाद : औरंगाबाद विभागाच्या चालू वर्षाच्या २,२६० कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. कोरोनामुळे कर संकलन घटले आहे. अर्थचक्र रखडल्याने पायाभूत सुविधांची कामे थांबली आहेत. येत्या एक मार्चला पुरवणी मागण्या सादर करुन आठ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. जिल्हा वार्षिक निधीशिवाय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विकासासाठी जिल्ह्यांना अतिरिक्त निधी दिला आहे. हा निधी योग्य पद्धतीने खर्च व्हावा, असे पवार म्हणाले.
दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीपेक्षा कमी निधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना सुखद धक्का दिला आहे. २०२०-२१ च्या तुलनेत प्रत्येक जिल्ह्याला जवळपास २५ ते ३० कोटींचा वाढीव निधी मिळाला आहे. तर औरंगाबाद, नांदेड आणि बीड जिल्ह्याला तब्बल ४० कोटींचा निधी वाढवून देण्यात आला आहे. जालना, हिंगोली, परभणीसाठी प्रत्येकी २५ कोटी, उस्मानाबाद ३० कोटी, लातूर ३५ कोटींचा वाढीव निधी मिळाला आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या विकासकामांचा आढावा घेऊन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या नियोजनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. मागील अर्थिक वर्षीच्या तुलनेत यंदा विभागासाठी ६० कोटी रुपये वाढीव निधी देण्याला आला आहे. केंद्र सरकारकडे राज्याचे थकीत २८ हजार कोटी रुपये मिळालेले नाहीत. अन्यथा, वाढीव निधीमध्ये आणखी भर टाकता आली असती, असे अजित पवार यांनी सांगितले.
पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण आहेत. केंद्राचा भरमसाठ कर लागलेला असून राज्याचा कर कमी करण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेऊ, शेतकऱ्यांनी वीज बिल भरुन सहकार्य करावे. हा निधी महावितरणच्या कामासाठीच वापरला जाणार असल्याचे पवार म्हणाले.
जिल्हा वार्षिक योजनेचे नियोजन
जिल्हा २०२०-२१ २०२१-२२ वाढ
हिंगोली १३५ १६० २५
उस्मानाबाद २५० २८० ३०
लातूर २४० २७५ ३५
बीड ३०० ३४० ४०
नांदेड ३१५ ३५५ ४०
परभणी २०० २२५ २५
जालना २३५ २६० २५
औरंगाबाद ३२५ ३६५ ४०
एकूण २००० २२६० २६०
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादकर सावधान! शिक्षक कोरोनाबाधित; शाळेला ८ दिवस सुटी
- मुंबईच्या महापौरांनी दिले लॉकडाऊनचे संकेत
- उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेते; राज्यात कायद्याचचं राज्य आहे – संजय राऊत
- महाविकास आघाडीचे उस्मानाबादला झुकते माप, दिला सर्वाधिक निधी
- बीएसएनएलच्या ‘या’ प्लान वर देण्यात येत आहे जबरदस्त ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

