🕒 1 min read
उस्मानाबाद : जिल्हा वार्षिक योजनेच्या इतिहासात उस्मानाबाद जिल्ह्याला प्रथमच सर्वाधिक २८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादेत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्याचा नियोजन आराखडा सादर केला. त्यात मागणीनुसार व आकांक्षित जिल्हा असल्याने उस्मानाबादसाठी यावेळी वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
सिंचन, अंगणवाड्यांचे बांधकाम,नवीन रोहित्र तसेच नवीन वीज वाहिनी, बंधारे दुरूस्ती आदी कामांसाठी वाढीव निधी मागण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्याने शेती आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन निती आयोगाने जिल्ह्याला ३ कोटींचे बक्षीस दिले. याबद्दल पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२१-२२ प्रारूप आराखडा राज्यस्तरीय बैठकीत जिल्ह्याच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, कैलास घाडगे-पाटील, सतीश चव्हाण, विक्रम काळे, इत्यादी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी यंत्रणांनी जिल्ह्यांतर्गत विकासकामे दर्जेदार करण्यावर भर द्यावा. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाठी प्राप्त निधी योग्य पद्धतीने खर्च करावा, असे निर्देश देत कर वसुलीवर भर देण्याच्या सूचना दिल्या. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी शासनाकडून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत १६० कोटी ८० लाख रुपयांची कमाल आर्थिक मर्यादा कळविली आहे. त्यानुषंगाने नियमित आणि नीती आयोग अंतर्गत प्रस्तावित २० कोटी रुपये आणि एकूण अतिरिक्त मागणी १०३ कोटी ६४ लाख रुपये ग्राह्य धरून एकत्रित अंतिम ३०४ कोटी ६४ लाख रुपये इतका आराखडा प्रस्तावित केला होता. त्याबाबत सविस्तर आढावा घेत वित्त मंत्र्यांनी जिल्ह्याच्या २८० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नोकरदारांसाठी महत्वाची बातमी: EPFO कडून व्याज दराच्या घोषणेची शक्यता
- काका, आपण ‘महाराष्ट्राचं नेतृत्व’ करावं ह्याच सदिच्छा ! तांबेंच्या शुभेच्छांनी चर्चांना उधाण
- स्टेजवर वर पुन्हा रंगणार डॉक्टर गुलाटी आणि चप्पूची जुगलबंदी
- ग्रेटाच्या टुलकिट प्रकरणात अडकलेला शंतनू मुळूक आहे तरी कोण?
- अलाहाबाद बँक ग्राहकांसाठी आले मोबाइल बँकिंग अॅप: जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
