मुंबई : राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. या दोन आठवड्यात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या अशाच प्रकारे वाढत राहिल्यास राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं पेडणेकर म्हणाल्या.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर अतिशय सूचक भाष्य केलं. ‘गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्णांचं प्रमाण अशाच प्रकारे वाढत राहिल्यास महापालिकेला कठोर निर्णय घ्यावे लागतील,’ असं पेडणेकर म्हणाल्या. कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ होत असून मृत्यूचं प्रमाणदेखील दिसू लागल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडून जिल्ह्यांमधील परिस्थिती जाणून घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेते; राज्यात कायद्याचचं राज्य आहे – संजय राऊत
- देवगिरी कारखाना सुरु होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन
- शेतीला सुरळीत वीजपुरवठा पाहिजे असेल तर वीजबिल भरावेच लागणार ?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- 15 व्या वर्षात घराबाहेर काढलेल्या कंगनाला नेटकऱ्यांनी केले पुन्हा ट्रोल


