औरंगाबाद : शहरात कोरोना आटोक्यात येत आहे असे वाटत असताना, पडेगाव येथील शाळेतील शिक्षक कोरोनाबाधित अढळल्याने शाळेला आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. शाळाकडुन योग्य ती काळजी घेतली जात असल्याने चिंतेचे कारण नसल्याचे शाळेकडुन सांगण्यात आले आहे.
शहरातील एका संस्थेच्या पडेगाव येथील उच्च माध्यमिक शाळेतील एक शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले असल्याचे शाळेकडून शिक्षण विभागाला कळविण्यात आले. पण काळजी म्हणून शाळा पुढील आठ दिवस बंद ठेवण्यात येईल. तसेच नियमाप्रमाणे तपासणी व निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहे असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.बी.बी. चव्हाण यांनी सांगितले. या दरम्यान कोरोनाबाधित आढळून आलेले शिक्षक आधीच दोन ते तीन दिवस शाळेत अनुपस्थित होते. त्यानंतर, शाळेला दोन दिवस सुटी होती. त्यामुळे चिंतेचे कारण नाही पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणुन आणि विद्यार्थ्यांना जोखीम नको, म्हणून संबंधित शाळा आठ दिवस बंद ठेवण्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे.
यादरम्यान जिल्ह्यात ७७ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५४ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ७२२ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार १४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७७ रुग्णांत मनपा हद्दीतील ७२, ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४६ आणि ग्रामीण भागातील ८, अशा एकूण ५४ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- ‘बहुदा ते माझा चेहरा विसरले असावेत’ ट्वीटर वापरकर्त्याला आर अश्विनच्या पत्नीच उत्तर !
- मुंबईच्या महापौरांनी दिले लॉकडाऊनचे संकेत
- उद्धव ठाकरे हे संवेदनशील नेते; राज्यात कायद्याचचं राज्य आहे – संजय राऊत
- महाविकास आघाडीचे उस्मानाबादला झुकते माप, दिला सर्वाधिक निधी
- बीएसएनएलच्या ‘या’ प्लान वर देण्यात येत आहे जबरदस्त ऑफर


