Share

अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता

Published On: 

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसुलीप्रकरणात नॉट रिचेबल असल्याने, नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक कुणाच्या भरवशावर लढायची?असा सवाल यानिमित्ताने सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांवर ही पोटनिवडणूक होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरहजेरीमुळे नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पराभवाची भीती वाटू लागली आहे. निवडणूक प्रचारात अनिल देशमुख नसल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे ओबासी आरक्षणाशिवाय ही पोटनिवडणूक होत आहे, त्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत एकीकडे भाजपचे दिग्गज नेते मैदानात असताना, अनिल देशमुख यांची अनुपस्थिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणणारी आहे. त्यामुळेच या पोटनिवडणुकीत अनिल देशमुखांच्या अनुपस्थितीचा राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!