Share

मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन

Published On: 

नाशिक : शुद्धलेखन ठेवा खिशात या छोट्या पुस्तिकेद्वारे शुद्ध मराठी भाषा घराघरात पोहोचवणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन झाले आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. नाशिक येथे त्यांचे निधन झाले. गेली चार वर्षे ते नाशिकला मुक्कामी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

भाषा या विषयात गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखननियम या चारही विभागांना समान गुणसंख्या असेल तर शुद्धलेखनाचे अध्ययन गांभीर्याने होईल, असे अरुण फडके यांचे मत होते. लेखन नियम आणि व्याकरणाकडे दुर्लक्ष झाले तर ती भाषा संकटात येऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. शुद्धलेखन हा आग्रह न होता सवय झाली पाहिजे हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं.

20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजनंतर पीएम केअर फंडमधून 3100 कोटी रुपयांचं : PMO

लेखनाच्या नियमांमध्ये एकवाक्यता असणारी भाषाच वेगात प्रगती करू शकते, असा त्यांचा विश्वास होता. अरुण फडके यांच्या जाण्यामुळे मराठी भाषेची मोठी हानी झाली असून मराठी भाषेवर अपरिमित प्रेम करणारे गुरुवर्य गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

तळीराम जोमात ! दारूच्या होम डिलेव्हरीला पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल, सहकुटुंब होते उपस्थित

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!