पुणे : पुण्यातील तळीरामांसाठी आता आनंदाची बातमी आहे. आता घर बसल्या दारू मिळणार असून दारूच्या होम डिलेव्हरीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. याआधी ई टोकन पद्धतीने दारू विक्रीला परवानगी दिली होती. मात्र आता 15 मे पासून घरपोच दारु विक्री केली जाणार आहे.
घरपोच दारु विक्रीबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकतंच नियमावली जाहीर केली. या नियमावलीनुसार कंटेनमेंट झोन आणि त्यालगत 500 मीटर क्षेत्रातील दारु विक्री दुकानं वगळून इतरांना घरपोच दारु देता येणार आहे. तर या घरपोच सेवेत देशी दारू देखील विकली जाणार आहे. घरपोच दारु विक्रीची सुविधा ही परवानाधारकांना उपलब्ध असेल. परवाना नसलेल्या ग्राहकांना संकेतस्थळावर परवाना तत्काळ उपलब्ध होईल.
मद्याची नोंदणी परवाना धारक ग्राहकाला व्हाट्सअॅप, भ्रमणध्वनी, दूरध्वनी माध्यमातून करु शकता. हे क्रमांक दारु विक्रेत्यांना ठळकपणे दुकानासमोर प्रदर्शित करावे. दारुची मागणीप्रमाणे घरपोच सेवा देण्यासाठी दारु विक्रेत्यांना स्वतःची वितरण व्यवस्था निर्माण करावी.प्रशासनाने ठरवून दिलेल्या कालावधीतच मद्यविक्री केले जाईल. मद्याची रक्कम ही रोख स्वरुपात अथवा क्रेडिट डेबिट कार्ड स्वाईप मशीनच्या माध्यमातून डिलिव्हरी बॉयनं स्विकारावी, असे नियम दारू विक्रीसाठी लावण्यात आले आहेत.
दरम्यान मद्य विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. मद्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेचा पुणेकरांनी चांगलाचं लाभ घेतला आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी पुणेकरांनी हायटेक फंडा वापरत ई टोकन घेतलं. तब्बल 10 हजार 877 पुणेकरांनी ऑनलाईन दारु खरेदीसाठी नोंदणी केली आहे. यामुळे आता दुकानासमोर लागणाऱ्या रांगा देखील कमी होणार आहेत. तर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती देखील संपणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
एकाचवेळी २८ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आरोग्यमंत्री टोपेंच्या उपस्थित दिला डिस्चार्ज
चंद्रकांत पाटलांचे पक्षासाठी शून्य योगदान, एकनाथ खडसेंनी घेतला समाचार
स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला ८ कोटी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

