Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल, सहकुटुंब होते उपस्थित

Published On: 

मुंबई :राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच निवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उतरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची असलेली विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज विधान भवनात दाखल केला.

यावेळी उद्धव ठाकरेंसह सहकुटुंब उपस्थित होते. पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रस नेते अशोक चव्हाण, आदि नेते उपस्थित होते. तर आघाडीच्या इतर उमेदवारांनीही मुख्यमंत्र्यांंसोबत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

येत्या 21 तारखेला विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.मंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी लवकरात लवकर आमदार म्हणून निवडून येणं गरजेचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊ नये, आणि निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती.

विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसने ऐनवेळी दुसरा उमेदवार देखील उभा केला होता. मात्र निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी हा उमेदवार पुन्ह कमी करण्यात आला. तसेच निवडणुकीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सद्स्य बनणार असल्यामुळे, महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता आता स्थिर राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

पत्रक जारी : गणेशोत्सव साजरा करताना ‘या’ सूचनांचे पालन करावे लागणार !

दारूची दुकानं उघडाल तर पुढच्या निवडणुकीला सत्ता गमवाल !

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, १२ मे पासून मर्यादित रेल्वे मार्गांवर रेल्वे सुरू

पोलिसांचा धोका वाढतोय ! कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!