नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 लाख कोटींचं पॅकेज केले आहे. यानंतर आता कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडमधून 3100 कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पी एम केअर फंडातून स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटींची तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 100 कोटींची तरतूद ही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी मदत म्हणून करण्यात आली आहे. केंद्र सरकार पीएम केअर फंडमधील 2000 कोटी रुपयांत 50 हजार व्हेंटिलेटर खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे सर्व व्हेंटिलेटर भारतीय कंपन्यांनी तयार केलेले असणार आहेत. यामुळे कोरोनाच्या लढ्याला नक्कीच बळ येणार आहे.
PM-CARES Fund Trust Allocates Rs. 3100 Crore for Fight against COVID-19. https://t.co/jMaY8ZTE7F
via NaMo App pic.twitter.com/fwlgJYVeRO
— PMO India (@PMOIndia) May 13, 2020
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पी एम केअर फंडची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये देशातील अनेक व्यासायीकांनी आर्थिक मदत केली होती. तसेच काही सर्वसामान्य नागरिकांनी देखील यामध्ये पैसे दान केले होते. त्यामुळे हा फंड आता कोरोनाच्या लढ्यात चांगलाचं उपयोगी पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूरहुन उत्तर प्रदेशातील मजूर झाले मार्गस्थ
मालेगावचे महापालिका आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

