भारत : जगातील पहिल्या दहा क्रमांकावर भारतातील दोन भाषांना स्थान मिळाले आहे. हिंदुस्थानच्या हिंदी भाषेचा मान जगभरात अधिकच वाढला आहे. देशभरात सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषा जगात सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी मोठी भाषा हा बहुमान हिंदी भाषेने मिळवला आहे.
विशेष म्हणजे जगात सार्वधिक बोलल्या जाणाऱ्या भाषणमध्ये बंगाली भाषेने सातवे स्थान मिळवले. हिंदुस्थानात बंगालीपाठोपाठ मराठी भाषेने सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. जगभरात 63.7 कोटी नागरिक हिंदी बोलतात. इंग्रजीने मात्र जगातील टॉपचे स्थान स्वत:कडे राखले आहे.
इथनोलॉग या सर्वेक्षण संस्थेने केलेल्या पाहणीत हि भाषावारी स्पष्ट झाली आहे. इथेनोलॉगच्या अहवालानुसार सध्या जगभरात 7 ,117 भाषा बोलल्या जातात आणि हिंदुस्थानात 456 भाषांचा वापर केला जातोय. 23 भाषा अशा आहेत कि जगातील सर्वाधिक नागरिक त्यांचा जास्त वापर करतात.
पहिली भाषा मायबोली असेल तर दुसऱया व्यवहारी भाषेच्या रूपात इंग्रजीचा सर्वाधिक वापर होत आहे. जगात व्यवहारी (नॉन-नेटिव)म्हणून इंग्रजी टॉपवर आहे ,तर मायबोली (नेटिव्ह ) म्हणून चीनची मंदारीन ही भाषा नंबर एक वर आहे. मायबोली म्हणून हिंदी देशात चौथ्या तर जगात सर्वाधिक वापरासाठी तिसऱया स्थानावर आहे.
जगभरातील पहिल्या दहा भाषांची आकडेवारी :
1) इंग्रजी 1262 नागरिकांकडून
2) चिनी मंदारीन 1120 नागरिकांकडून
3) हिंदी 637 नागरिकांकडून
4) स्पॅनिश 538नागरिकांकडून
5) फ्रेंच 277नागरिकांकडून
6) अरबी 274नागरिकांकडून
7) बंगाली 265नागरिकांकडून
8) रुसी (रशियन ) 258नागरिकांकडून
9) पोर्तुगाली 252नागरिकांकडून
10) इंडोनेशियाई 199नागरिकांकडून
जगातील 2,926 भाषांचे अस्तित्व धोक्यात आहे. जगात 23 भाषा अशा आहेत कि जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या त्या भाषांचा वापर करते. दुर्दैवाने जगातील 2,926 बोली भाषांचे अस्तित्व जागतिकीकरणामुळे धोक्यात आले आहे. आशिया खंडात 2,294, आफ्रिका खंडात 2,144 , अमेरिकेत 1,061 तर पॅसिफिक खंडात 1,313 भाषांचा वापर करतात.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापराचे नियम 1 जानेवारीपासून बदलणार…
- बळीराजावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पुढील दोन दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
- शेतकरी आंदोलन : वॉशिंग्टनमध्ये म. गांधींच्या पुतळ्याची विटंबना,खलिस्तानी झेंड्यानं झाकला चेहरा
- पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या मुलीच्या ‘त्या’ अफवांवरून नाराज
- शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

