Share

बळीराजावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पुढील दोन दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Published On: 

पुणे : राज्यात पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकणामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही भागांध्ये गुरुवार आणि शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि कोकणसह मराठवाडा, विदर्भात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. हे ढगाळ वातावरण पुढच्या एक-दोन दिवसात निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

गेले दोन दिवस कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुढील दोन दिवस कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभावमुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!