नवी दिल्ली: कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, त्याचबरोबर अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफिसला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर येत आहेत.
तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतात डिजिटल पेमेंटच्या व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात या सगळ्याला अधिकच चालना मिळाली. त्यामुळे सध्या कोणतेही व्यवहार करण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डसचा वापर सर्रास केला जातो.
मात्र, 1 जानेवारीपासून डेबिड आणि क्रेडिट कार्डसच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँके कडून कॉन्टॅक्टलेस कार्डसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आता कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डसद्वारे कोणत्याही पिन क्रमांकाशिवाय व्यवहार करण्याची मर्यादा पाच हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी पिन क्रमांकाशिवाय डेबिट आणि क्रेडिट कार्डवरुन केवळ 2000 रुपयांपर्यंतचेच व्यवहार करण्याची मुभा होती.
कोरोना या संसर्गजन्य साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टन्सिंगच पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे बँकांचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्याकडे लोकांचा काळ वाढला आहे. यासाठी आता आणखी पुढचे तंत्रज्ञान देखील बँक ग्राहकांना उपलब्ध झाले आहे. ज्यामध्ये कार्ड स्वाइपची आवश्यकता नसणार आहे.
आतापर्यंत आपण क्रेडिट किंवा डेबिड कार्डने पेमेंट करताना कार्ड हे पीओएस मशीनमध्ये टाकून स्वाईप केले जायचे. यानंतर तुम्हाला मशीनवर पिन क्रमांक टाकावा लागत होता. पिन टाकल्यानंतर तुमच्या कार्डमधून पैसे वळते होत असत. मात्र, कॉन्टॅक्टलेस कार्डमध्ये असणाऱ्या मॅग्नेटिक स्ट्रिप आणि एनएफसी अँटिनामुळे कार्ड स्वाईप करण्याची गरज उरलेली नाही. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड फक्त पीओएस मशीनवर धरल्यासही तुमच्या खात्यातून पैसे वळते होतात.
मात्र, या व्यवहारातील धोका लक्षात घेऊन सुरुवातीच्या काळात कॉन्टॅक्टलेस कार्डच्या पेमेंटसाठी दोन हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र, 1 जानेवारीपासून ही मर्यादा 5 हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे. लीकडच्या काळात बँकेकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक डेबिट कार्डात कॉन्टॅक्टलेस कार्डची सुविधा असते. तुमच्या कार्डात ही सुविधा असेल तर कार्डच्या वरच्या भागात डाव्या बाजूला वायफाय नेटवर्कचा लोगो असेल.
महत्वाच्या बातम्या
- टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णबला दणका; रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक
- महाराष्ट्र शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला तर ‘तो’ दिवस दूर नाही -प्रफुल पटेल
- ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेने, संयमाने साजरा करु’
- शेतकरी हिताच्या नव्या कृषी कायद्यांबाबत संभ्रम पसरवला जात आहे – राणाजगजितसिंह पाटील
- उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन, भाजपचा चहापानावर बहिष्कार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

