Share

शेतकरी आंदोलन : वॉशिंग्टनमध्ये म. गांधींच्या पुतळ्याची विटंबना,खलिस्तानी झेंड्यानं झाकला चेहरा

Published On: 

वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय दूतावासासमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पुतळ्यावर खलिस्तानचे झेंडे असल्यामुळे, शेतकरी आंदोलनाच्या आडून खलिस्तानी संघटनांनी हे कृत्य केल्याचे दिसून येत आहे.

वॉशिग्टनमधील भारतीय दूतावासासमोरील महात्मा गांधी मेमोरियल प्लाझासमोर असलेल्या गांधी पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाकडून या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेचा दूतावासाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.

शांती व न्यायाचे प्रतिक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा आम्ही निषेध करतो, असे दूतावासाने म्हटले आहे. दूतावासाने अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!