टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला राज्य सरकारकडून मिळाले आरक्षण हे वैध आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मराठा समाजात एकंदरीतच आनंदाच वातावरण आहे. तसेच मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे मराठा समाजाकडून पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
येत्या १० जुलै ला सकाळी ११ वा परळी येथे समस्त मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश देशमुख यांनी दिली. राज्य सरकारकडून मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकरी मध्ये १२ आणि १३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
दरम्यान राज्य सरकारला १०२ च्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे. असे न्यायालयाने म्हंटले. इतकेच नव्हे तर आयोग नुसार मराठा समाज मागास आहे. अपवादात्मक स्थितीत ५० टक्के आरक्षणात बदल शक्य असल्याचेही न्यायालयाने म्हंटले आहे. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण सुरु राहील परंतु १६ टक्के नाही, असेही न्यायालयाने म्हंटले. नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

