मुंबई : सुप्रीम कोर्टात सलग चार दिवसांपासून मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू होती. सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार, मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवादचा आजचा शेवटचा दिवस होता. याचबरोबरीने देशाचे महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी देखील सुप्रीम कोर्टाचे अधिकारी या नात्याने बाजू मांडलेली आहे. उद्यापासून राज्य सरकार, विनोद पाटील यांचे वकील व इतर सर्व आरक्षण समर्थक आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडतील.
यावेळी केंद्र सरकारतर्फे बाजू मांडताना देशाचे महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. १०२व्या घटनादुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार काढून घेतला नसल्याचे यावेळी केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी सांगतिल आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता मराठा आरक्षणावरील सुनावणीला गती येणार असल्याचे म्हटले जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. हा तिढा लवकर सुटावा म्हणून राज्यातील अनेक नेत्यांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न केले. मराठा आरक्षणावर निर्माण झालेला संभ्रम केंद्राने दूर करावा यासाठी खासदर संभाजीराजे भोसले, राजेंद्र कोंढरे यांनी आपल्या शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत, राज्यमंत्री रतनलाल कटारिया आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली होती.
या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आपली बाजू मांडताना १०२व्या घटनादुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार काढून घेतला नसल्याचे कोर्टात सांगितले आहे. तसचे राज्यांना त्यांच्या अखत्यारीतील ओबीसी आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचेही वेणूगोपाल यांनी न्यायालयात सांगितलं.
दरम्यान, केंद्र सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भातील या स्पष्टीकरणामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीला आणि एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला गती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हिटमॅन रोहित शर्माने छोट्या पण धडाकेबाज खेळीने केले तब्बल तीन पराक्रम!
- फाटलेल्या जीन्स पेक्षा फाटलेल्या आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या : उर्मिला मातोंडकर
- परभणीत वायर टाकून वीजचोरी, गुन्हा दाखल
- ६०० व्यापाऱ्यांच्या चाचणीत आज ५७ जण पॉझिटिव्ह
- मतांसाठी नेत्यांनी लाजा सोडल्या! मंत्री सत्तार, भुमरे, दानवे यांनी नियम फाट्यावर मारले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
