मुंबई : मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि सरकारचे कायदेविषयक सल्लागार आणि तज्ज्ञ यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. यामधील काही मान्यवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या, माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. आज (रविवारी) सह्याद्री अतिथिगृहावर ही हाय व्होल्टेज बैठक पार पडलेली आहे.
या बैठकीनंतर राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषेद घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात ‘आऊट ऑफ द बॉक्स’ जाऊन विचार होणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे सर्वपक्षीयांची जबाबदारी आहे. मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेला गायकवाड आयोग हा राजकीय नाही. गायकवाड आयोगानुसार, ७० टक्के मराठा समाज मागास आहे, असे उदयनराजे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मराठा आरक्षण राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आले आहे. असे असतानाही त्याची अंमलबजावणी करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, राज्य सरकारकडे एकूणच इच्छाशक्तीचा अभाव आहे. मराठा आरक्षणाबाबत आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागले. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढावी. त्यामुळे राज्यातील जनतेला सत्य परिस्थिती समजेल, असेही उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावाची शिकवण स्मरणात ठेवायला हवी. कोणता एक बडा नेता किंवा मोठा माणूस म्हणून नाही, तर देशाचा एक नागरिक म्हणून मत व्यक्त करतोय, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे चुल मांडत आंदोलन
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
