Share

मराठा आंदोलन: ठिय्या आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Published On: 

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात क्रांती चौक येथे ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा क्रांती मोर्चा विविध स्वरूपाची आंदोलन करत आहे. साष्ट पिंपळगाव येथे ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण सुरू केले होते. त्याला मराठा मोर्चानेही पाठिंबा दिला होता. उपोषण सोडले असले तरी अद्याप आंदोलन सुरूच आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी तसेच विद्यार्थ्यांनी राजकारण्यांच्या निषेधार्थ बॅनर झळकावत आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला काही वेळ आंदोलकांनी घोषणाबाजी करत क्रांती चौक परिसर दणाणून सोडला होता. आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचेही आंदोलनादरम्यान सांगितले. त्यानंतर आंदोलकांचा रस्त्यावर येण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी आंदोलनाला पण परवानगी नसल्याचे सांगत त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली. कारवाई पूर्ण झाल्यानंतर आंदोलकांना सोडण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!