पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ६६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार कोहलीने शिखर धवनसोबत शतकी भागीदारी करताना अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकादरम्यान कोहलीने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
विराट कोहली हा जगाच्या पाठीवर असा पहिलाच फंलदाज ठरला आहे ज्याने सर्वात कमी डावात घरच्या मैदानावर १० हजार धावा पुर्ण केल्या. विराट कोहलीने हा कारनामा १९५ डावात पुर्ण केला आहे. या विक्रमासह कोहलीने ऑस्ट्रेलीयाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगलाही पिछाडीवर सोडले आहे. रिकी पॉन्टींगने आपल्या १० हजार धावा या २१९ डावांमध्ये पुर्ण केल्या होत्या.
या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा तिसऱ्या स्थानावर आहे. सचिनने आपल्या १० हजार धावा या २२३ डावांमध्ये पुर्ण केल्या होत्या. सचिनसोबत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने यानेही तितक्याच डावात आपल्या १० हजार धावा पुर्ण केल्या होत्या. तर जयवर्धनेनंतर श्रीलंकेचाच माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगाकाराचा क्रमांक लागतो. संगाकाराने २२९ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- हिंगोली स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी निधीला मंजुरी
- पदार्पणातच ‘प्रसिद्ध कृष्णा’ने इंग्रजांची केली फजिती; भारताचा दणदणीत विजय
- वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला चपलांचा हार
- संसदेच्या नवीन इमारतीपेक्षा आज जीव वाचवणे महत्त्वाचे – खा. इम्तियाज जलील
- सार्वजनिकरीत्या होळी, धुलिवंदन साजरा करण्यास मुंबई महापालिकेची मनाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

