मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला. पावसाची तमा न करता हजारो कार्यकर्ते आंदोलनस्थळी हजेरी लावली आहे. पक्ष आणि संघटना विरहित या आंदोलनातून मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाची संघटित शक्ती एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
एकीकडे मराठा आरक्षणासाठी उद्या अर्थात 16 जूनपासून मूक मोर्चांना सुरुवात होत असताना, तिकडे ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटना आंदोलन करणार आहेत. ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 17 जून रोजी दुपारी 12 वाजता नाशकात रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनाला सुरुवात होईल.
एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील धनगर आरक्षण हा मुद्दा देखील पेटू लागला आहे. धनगर आरक्षण समितीकडून धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अधिवेशनामध्ये ठराव मांडून तो संमत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारने ठराव मंजूर न केल्यास मुख्यमंत्र्यांना पंढपुरात येऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य आदित्य फत्तेपूरकर यांनी दिला आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून या सर्व आंदोलनांमुळे राज्यातील ठाकरे सरकारच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. विविध समाज आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी आक्रमक होत असून राज्यात सत्तेवर असणाऱ्या प्रमुख तीन पक्षातील नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे हे मात्र नक्की.
महत्वाच्या बातम्या
- जय श्री रामच्या घोषणा दिल्या नाहीत म्हणून नव्हे तर ‘या’ कारणासाठी झाली ‘त्या’ वृद्धाला मारहाण
- नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलोय – चंद्रकांत पाटील
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
- जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना आश्वासनाखेरीज सरकारने काहीही दिले नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
