कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. यामुळे मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
विविध जिल्ह्यांमध्ये मराठा नेते बैठका घेऊन पुढील दिशा ठरवत आहेत. कोल्हापुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला इशारा दिला आहे. यासोबतच, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालं. आता आरक्षणावरुन पळवाटा काढायचं काम सुरू आहे, असा गंभीर आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘जनता हेच सर्वात मोठं न्यायालय आहे. आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही. जनता हेच सर्वात मोठं न्यायालय आहे. आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही. आम्ही कोणावर विश्वास ठेवायचं याचं स्पष्टीकरण द्या. मुख्यमंत्र्यानी सर्वपक्षीय अधिवेशन बोलवावं. सरकारने मराठा आरक्षणाची भूमिका कधी घेणार हे सांगावं. तसंच ओबीसींप्रमाणे फी माफी करावी,’ अशी मागणी देखील आबासाहेब पाटील यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘युवराज आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम पूर्णतः बोगस व बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले’
- १८-४४ वर्षांवरील लसीकरणाचा वेग मंदावणार ; जेष्ठांना प्राधान्य
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी जमली तुफान गर्दी
- महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे २ हजार बाधित रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू : आरोग्यमंत्री
- ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना ?, ठाकरे सरकारमधील मंत्र्याला संशय…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

