Share

ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना ?, ठाकरे सरकारमधील मंत्र्याला संशय…

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : राज्यासह देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन्स मिळत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे अनेकांचा प्राणास मुकावे लागत आहे.

अशात कोरोनाच्या या भयावह परिस्थितीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ही ऑगस्टच्या आसपास येणार असल्याची शक्यता विविध तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, यशोमती ठाकूर यांनी आता ज्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे तीच तिसरी लाट तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे.

आम्हाला अशी शंका आहे की, ही तिसरी लाट तर नाही ना ? कारण ग्रामीण भागात जास्त प्रादुर्भाव होत आहे. ग्रामीण भागातून अनेक रुग्ण सापडू लागले आहेत. दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्हा यंत्रणेने जागोजागी, गावेगावी कन्टेनन्मेंट झोन तयार केलेले आहेत. सगळ्यांना विनंती करताहेत की काळजी घ्या, तरीही काही लोकं ऐकत नाहीएत, अशी खंत वाटत आहे, असे ठाकूर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!