करमाळा : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना औरंगाबादमधील एका युवकाने घेतलेल्या जलसमाधीनंतर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या हाकेनंतर करमाळा तालुक्यातील जेऊर बंद ठेवून शासनाचा निषेध केलेला आहे. जेऊर मधील सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद केल्या आहेत. तर सर्वांनी शांततेत बंद पाळावा अस आवाहन करण्यात आले आहे.

काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, भावाला मिळणार नौकरी
जेऊर हे १५ हजार लोकसंख्याचे गाव असून या गावात मोठी बाजारपेठ आहे. टेंभुर्णी-नगर या राष्ट्रीय महामार्गावर हे गाव असून आज शासनाचा निषेध म्हणून गावातील जेऊर व्यापारी संघटनेने बाजारपेठ बंद केल्या.

दरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली होती याचा परिणाम ग्रामीण भागात ही पहायला मिळत असून करमाळा तालुक्यातील जेऊर मध्ये बंद पाळण्यात आला.
काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या
- मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
- मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
- राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
- आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
- मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
- अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

