Share

मराठा ठोक मोर्चा : औरंगाबाद मध्ये इंटरनेट सेवा बंद

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या ठोक मोर्चाला राज्यभर हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

तर काल मराठा आरक्षणाची मागणी करत गोदावरीत उडी घेतल्यानंतर मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे या तरुणावर आज सकाळी अंत्यसंस्कार झाले. यावेळी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या खासदार चंद्रकांत खैरै आणि आमदार सुभाष झांबड यांना रोखण्यात आले. तसेच त्यांना मारहाण केल्याचीही घटना घडली.

दरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाखेड येथे आज मराठा क्रांती मोर्चाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी ही घटना घडली

काकासाहेबाला वाचवता आलं असत मात्र निवेदन देऊन प्रशासनाचा काना डोळा

मराठा क्रांती मोर्चा : शिवसेना खासदाराला आंदोलकांची मारहाण

काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, भावाला मिळणार नौकरी

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!