Share

धनंजय मुंडे प्रकरणात अनेक ट्विस्ट त्यामुळे काहीही समजेनासं झालं आहे- सुप्रिया सुळे

Published On: 

औरंगाबाद:- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एका महिलेने केलेल्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे मुंडे यांच्यासोबतच पक्षाच्या नेत्यांना देखील टीकेचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे तक्रारदार महिलेकडून मला आणि माझ्या वकिलांना जीवे मारण्याचीही धमकी मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंडे यांचे प्रकरण बाहेर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून केली जात आहे. परंतु चौकशी पूर्ण झाल्यावर निर्णय घेऊ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर अनेक ट्विस्ट त्यात आले आहेत. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय यात गोंधळ निर्माण झाला आहे. काहीही समजेनासं झालं आहे. विषय अतिशय संवेदनशील आहे. कोणताही आरोप जेव्हा त्या कुटुंबावर होतो, त्या कुटुंबात इतरही लोक असतात. भारतातील कुटुंब म्हणजे कपल नसतं. ती फॅमिली कशातून जाते याचा आपण दोन्ही बाजूंचा सर्वांनी विचार करायला हवा, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!