Share

“नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही”, चंद्रकांत पाटलांचा इशारा

Published On: 

मुंबई: राज्यात राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून भाजपने महाविकास आघाडी सरकारकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र अजूनही त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाहीये. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी थेट इशारा दिला आहे.

“नवाब मलिक यांचे समर्थन करून ठाकरे सरकार दाऊदचे समर्थन करत आहे. दाऊदसह कारवायांमध्ये मलिकांचा सहभाग आहे, हे न्यायालयाने मान्य करत त्यांना कोठडी दिली आहे, तरीही संपूर्ण मंत्रिमंडळ मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलन करते आहे. ही आश्चर्याची बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्ष शांत बसणार नाही.”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेईल की काय या भीतीने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई करत नसल्याचा आरोपही भाजपने केला आहे. तसेच भाजपने ‘नवाब मलिक हटाव, देश बचाव’ हे अभियानही सुरु केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!