Share

लस घेतल्यानंतर विराट कोहलीनं केलं महत्वाचं आवाहन

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर भारताचा सलामीवीर शिखर धवनने कोरोनाची लस टोचवुन घेतली आणि इतरानाही अवाहन केले होते की लवकरात लवकर लस घ्या. धवननंतर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने कोरोना लस टोचवून घेतली.

virat

यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लसीचा पहिला डोस घेत आहेत. लस घेतल्यानंतर विराटने इंस्टग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे यावेळी त्यानं इतरांनाही शक्य तितक्या लवकर ही लस घ्या, असे आवाहनदेखील केलं आहे. दरम्यान, कोरोना लढ्यात विराटही मैदानावर उतरला आहे. त्यानं पत्नी अनुष्का शर्मा व Kettoसह 7 कोटींचा निधी गोळा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!