जालना: जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रुग्णांना थेट शहर गाठावे लागायचे नाहीतर राजूर येथे उपचार घेण्यासाठी जावे लागायचे. यात रुग्णांची तसेच त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांची फरफट होत आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास २ हजार आहे. ही बाब लक्षात घेऊन आता भोकरदन येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्याची मान्यात मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
भोकरदन येथ तीन शासकीय वसतीगृह प्रत्येकी ७०, ७५ तसेच १०० विद्यार्थी निवासाची अद्ययावत सूविधेचे आहे. या ठिकाणी ऑक्सीजन बेड असलेले कोविड रुग्णालय झाल्यास अनेक ग्रामस्थांची फरफट थांबेल. ही बाब आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाही पटल्याने त्यांनी याला तत्वतः मान्यता दिल्याने भोकरदनकरांना आता लवकरच अद्ययावत (डीएचएससी) कोवीड सेंटरची सूविधा मिळणार आहे.
पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील आरेाग्य सेवा देणाऱ्या केंद्रांचा पाहणी दौरा हाती घेतला असून रविवारी सकाळी त्यांनी भोकरदन येथील उपजिल्हा रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना बाधित होत असलेल्या रूग्णांची तसेच गावांची माहिती जाणुन घेतली. शिवाय उपलब्ध सूविधांचीही माहिती घेतली. मात्र, या तालुक्यातील रूग्णांना राजुर वगळता एकाही ठिकाणी अद्ययावत ऑक्सीजनची सूविधा असलेले कोविड सेंटर नसल्याची बाब लक्षात आली. या वेळी त्यांनी तत्काळ पर्याय म्हणुन भोकरदन येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्याची मान्यता दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई इंडियन्सचा खेळाडू पियुष चावलाच्या वडिलांचे कोरोनाच्या संसर्गामुळे दुर्दैवी निधन
- CSK पाठोपाठ सनरायझर्स हैदराबादनेही केली 30 कोटींची मदत
- परतूर रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा कधी मिळणार? ‘ते नंतर बघू’- राजेश टोपे
- ‘मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनलेय’
- आसामच्या मुख्यमंत्रिपदी हेमंत बिस्व सरमा, शपथग्रहण सोहळा संपन्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

