उस्मानाबाद : कोरोना संसर्गाने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे दररोज अनेकांचा मृत्यू होतोय. सध्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव वाढला आहे. कोरोना संसर्गापासून विधिज्ञ मंडळाचे सदस्यही सुटलेले नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील प्रख्यात वकिलांना कोरोनाची लागन होऊन जीव गमवावा लागला आहे. त्यांना कसलेही सुरक्षा कवच नाही. त्यामुळे वकिलांनाही कोरोना योद्ध्यांप्रमाणे विमा कवच देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
न्यायालयीन कामकाजानिमित्त वकिलांचा थेट संपर्क पक्षकारांशी येतो. अनेक पक्षकार कोरोना पॉझिटिव्ह असतात. पण ते माहिती लपवतात. किंवा आपण पॉझिटिव्ह आहोत हे त्यांना माहितही नसते. त्यामुळे विधिज्ञांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण होतेय. यातून बहुतांश वकिल सुखरूप बाहेर निघालेत. पण दुर्दैवाने काही जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यामध्ये अनेकजण ४५ वर्षे वयापेक्षा कमी वयाचे आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १३ वकिलांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झालाय. त्यातच शहरातील प्रसिद्ध वकील राजेश अंधारे यांचे अल्पशा आजाराने सोलापूर येथे काल रविवारी निधन झाले. त्या अनुषंगाने कोरोनामुळे मृत झाल्यात संबधित वकिलाच्या वारसांना विमा कवचचा लाभ देण्यात यावा अशी मागणी होतेय.
आर्थिक मदतीसाठी मोदींना साकडे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भुसावळ येथील एका वकिलाने पंतप्रधान मोदींना एक निवेदन पाठवले होते. कोरोनामुळे अनेक घटकांसह वकिलांनाही आर्थिक झळ सोसावी लागत आहे. कोरोनामुळे नियमित कामकाज होत नसल्याने वकिल बांधव आर्थिक अडचणीत आहेत. यामुळे देशातील सर्व वकिलांना आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी एका वकिलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई मेलद्वारे केली होती.
वकिल हा घटक पूर्णपणे वकिली व्यवसायावर अवलंबून आहे. वकिलीचा व्यवसाय सोडून वकील बांधवांना दुसरे कोणतेही उत्पन्न नसते. मार्च २०२० पासून कोरोना महामारीमुळे कोर्ट नियमित कामकाज करू शकत नाही. म्हणून बहुतांश वकीलांवर आर्थिक संकट आले आहे. वकिलांनी नेहमी देशाच्या विकाससाठी योगदान दिले आहे. यामुळे आजच्या गंभीर स्थितीत सरकारने वकील वर्गाच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- लता मंगेशकर यांनी जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे पत्र लिहीत केले कौतुक
- जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- रुग्णसेवेत कसलीही तडजोड नको; आरोग्य सेवा दर्जेदार असावी, राजेश टोपेंचे वक्तव्य
- काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी केली कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज मिळणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

